#खानापूरात जुन्या कोर्ट आवारात बहुमजली व्यापारी संकुलन उभारा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराची दिवसेदिवस वसाहतीसह लोकसंख्या वाढत आहे. तेव्हा सर्वाच्या सोयीसाठी खानापूर शहरातील शिवस्मारक चौकाजवळील जुन्या कोर्ट येथील जागेवर बहुमजली व्यापारी संकुलन उभारावे.अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी शनिवारी खानापूरात जिल्हा अधिकारी मोहमद रोशन आले असता.त्याची भेट घेऊन निवेदन सादर केले.
प्रारंभी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी जिल्हाधिकरी मोहमद रोशन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
निवेदनात म्हटले आहे की,खानापूर शहरात एकमेव अशी जागा म्हणजे जुन्या कोर्ट जागा होय. याजागेवर बहुमजली व्यापारी संकुलन उभारावे .याठिकाणी भाडेतत्वावर तरूणासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा.यामध्ये व्यापारी,नोटरी,काॅम्पूटर क्लाॅसेस,बुकस्टाॅल,मेडिकल शाॅप,व इतर सोयी उपलब्ध कराव्यात. कारण याच भागात भव्य असे सरकारी हाॅस्पिटल आहे. हायस्कूल ,काॅलेजीस आहेत.त्यामुळे सर्वाचीच सोय होईल.
सध्या मोजकेच गाळे उभे आहेत. परंतु याठिकाणी बहुमजली इमारत उभारूण व्यापारी संकुलन उभे करावे. असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाधिकारी मोहमद रोशन यानी निवेदनाचा स्विकार करून संबधित व्यापारी संकुलनाचा आराखडा तयार करून सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी ,शहर अध्यक्ष महांतेश राऊत , ट्यूबनल सदस्य विनायक मुतगेकर, सुर्यकांत कुलकर्णी ,अँड चेतन मणेरीकर आदी खानापूर शहरातील नागरीक उपस्थित होते.