#बेडकिहाळ येथील ५व्या ग्रामिण मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
‘इन न्यूज’ वृत्तवाहिनीचे खानापूर प्रतिनिधी अल्ताफ एम. बसरीकट्टी यांना निपाणी तालुक्यातील बेडकहाळ येथे आयोजित ५ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ‘राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार २०२५ सन्मानपत्र आणि ‘राष्ट्रीय आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘इन न्यूज’चे वार्ताहर म्हणून त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, के. बसवंत नागू शिघाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विक्रम बसवंत शिघाडे यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. बेडकहाळ येथील देशप्रेमी रत्नप्पा कुंभार सभागृहात आयोजित एका विशेष समारंभात त्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.