#खानापूर सार्वजनिक बांधकामाच्या विश्रामधामात भेट!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हल्याळ तालुक्याचे माजी मंत्री व आमदार आर .व्ही. देशपांडे यांचे शुक्रवारी दि २५ रोजी कार्यक्रमानिमित्त खानापूरात आगमन झाले.यानिमित्त खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्या वतीने येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात खानापूर तालुका क्राॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भेट घेतली.
प्रारंभी खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी ,शहर अध्यक्ष महांतेश राऊत व काॅग्रेस नेत्यांच्या हस्ते ,माजी मंत्री ,विद्यामान आमदार आर.व्ही. देशपांडे यांचा शाल ,पुष्पहार घालुन त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार आर. व्ही.देशपांडे, म्हणाले की खानापूर तालुक्याने पहिला आमदार काॅग्रेसचा दिला आहे. त्यानंतर माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर यानी खानापूर तालुक्याचे आमदार पद भूषविले आहे. तेव्हा अजुनही वेळ गेली नाही.खानापूर तालुक्यात काॅग्रेसचा आमदार होण्यास पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.हे भांकित आहे. खानापूर तालुक्यातील काॅग्रेस नेत्यानी ,कार्यकर्त्यानी आपापसातले हेवे दावे बाजुला ठेवून एक जुटून काॅग्रेस पक्षाच्या एक जुटीसाठी प्रामाणिक कार्य करा.असा सल्ला दिला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांनी माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर याच्या मार्गदर्शनाखाली काॅग्रेस पक्षाची प्रगतीची वाटचाल चालु आहे. पंचहमी योजनेचा प्रचार तालुक्याच्या प्रत्येक खेडोपाडी जाऊन योजना राबवत आहे.याचा लाभ गोरगरीब कुंटूबाला मिळत आहे असा विश्वास दिला.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी, शहर अध्यक्ष महांतेश राऊत, नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक प्रकाश बैलूरकर,मजहर खानापूरी, ट्रयूबल मेबर विनायक मुतगेकर, सुर्यकांत कुलकर्णी ,सुरेश जाधव ,प्रकाश मादार ,एम .एम .सावकार,लियकत बिच्चणावर,मधुकर कवळेकर,संतोष हंजी,रफिक वारेमनी मेघणा देसाई,आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी आभार मानले.