संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जलजीवन योजनेंतर्गत खानापूर तालुक्यातील बरगांव ,भंडरगाळी ही दोन गावे २४ तास पाणी पुरवठ्याचा लाभ घेणारी पहिली गावे आहेत.तेव्हा पाणी जपून वापरा.अशी माहिती आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी गरूवारी दि .२४ रोजी उदघाटन प्रसंगी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की या दोन्ही गावच्या नागरीकाना २४ तास पाणी उपलब्ध व्हावेे. यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते पाण्याच्या पाईपलाईनचे उदघाटन करण्यात आलेे.
कार्यक्रमाला जे जे एम योजनेचे जिल्हा व्यवस्थापक नीलम्मा कामते,सेक्शन आँफिसर किरण मथाडा ,ग्राम पंचायत अध्यक्ष चांगुना हणमंत पाटील, उपाध्यक्ष गोविंद पाटील,सर्व ग्राम पंचायत सदस्य ,कर्मचारी,गावचे नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पी डी ओ चन्नबसय्यास्वामी कलमठ यानी शपथ घेतली.