#नुकताच दुरूस्त केलेल्या रस्त्याच्या कामाचा लाखो रू.निधी वाया!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील बेकवाड हलशी या सात किलो मिटर अंतराच्या रस्त्याच्या गेल्या एप्रिल महिण्यातच दुरूस्तीचे काम करण्यात आले. मात्र चार महिण्यातच रस्त्याची दैयनिय आवस्था झाली.कंत्राटदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहनधारकांना या रस्त्यावरून येजा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दुसरीकडे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो रूपयाचा निधी वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे. यात भ्रष्टाचारा झालाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लाखो रूपयाचा निधी वापरून बेकवाड हलशी रस्त्यावर काही ठिकाणी केवळ ५० मीटर , तर काही ठिकाणी १०० मीटर ,तर २०० मीटर अंतराचा रस्त्याच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयाची निधी खर्च केला तो ही पाण्यात गेला.
सध्या रस्त्याच्या दैयनिय आवस्थेमुळे दुचाकी वाहन धारकाना जीव मुठीत घेऊन येजा करावी लागते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे याभागातील वाहनधारकातुन नाराजी पसरली आहे.
संबधीत निकृष्ठ दर्जाच्या रस्त्या कामाची चौकशी व्हावी. कंत्राटदारावर कारवाई व्हावी.यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.