#नदी घाटावर चप्पल दिसल्याने संशय!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सुर्या स्वामीलचे मालक व खानापूर मारवाडी समाजातील जेष्ठ नागरीक दयालाल कर्षन पटेल ( वय ६१) हे मंगळवारी दि ८ पासुन बेपत्ता झाले होते.
त्यामुळे घरच्या कुटूंबानी सर्वत्र शोधाशोध केली. नातेवाईकाकडून चौकशी केली मात्र पत्ता लागला नाही.
खानापूर मलप्रभा नदीवर घाटावर त्यांचे चप्पल सापडले .त्यामुळे संशय आल्याने शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शुक्रवारी दि ११ रोजी अग्नीशामक दलाच्या जवानाना घटनेची माहिती दिली.
आज शुक्रवारी दुपारी १२ वाजता मलप्रभा नदीतीच्या कुप्पटगीरी नजीक नविन पुलापासुन जवळ बांबूच्या झुडूपात मृतदेह आडकलेल्या आवस्थेत आढळला. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानानी बांबूच्या झुडपात आडकलेल्या आवस्थेतील मृतदेह बाहेर काढला
यावेळी शोध मोहिमेत अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी जवान सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एफ डी मारूती देसाई ,शरीफ नदाफ,रवीकुमार मल्लूर,संजय जंगी सुनिल शीमनगौडर,मुदगाप्पा तरगार आदीच्या अथक प्रयत्नाने मृतूदेह बाहेर काढण्यात आले .
घटनेची माहिती पोलिसाना मिळताच पोलिसानी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखान्यात पाठवुन शवविच्छेदन करून मृत्यूदेह नांतेवाईकांच्या तांब्यात देण्यात येईल .