#”खानापूर जवळील गडवीर नगरात ट्रान्सफाॅर्मर व वीजपुरवठ्यासाठी ५ लाख रू निधी मंजुर करून केली सोय”!
#माझ्या अनुपस्थितीत घिसाडघाईने केले उदघाटन!
#पारिश्वाड क्राॅसवरील खड्डा ही आमदाराच्या अनुपस्थित बुजविण्याचा प्रयत्न!
#खानापूर भाजप मध्ये चढाओढीचे प्रकार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या गडवीर नगरासाठी २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी ट्रान्सफाॅर्मर व इतर सोयीसाठी आमदार यानात्याने ५ लाखाचा निधी मंजुर करून याठिकाणी वीजपुरवठा तसेच पथदिपाची सोय करण्यात आली.
या़ कार्यक्रमाचे उदघाटन करण्यासाठी मी परदेश दौरा करून आल्यानंतर तारीख देणार होतो. पण माझ्या अनुपस्थित उदघाटन सोहळा करण्यासाठी माझी आमदारानी श्रेय घेण्याचा प्रकार दिसुन आला. असे माझे ठाम मत आहे. आपण आमदार असताना का प्रयत्न झाले नाही. असा सवाल मी करतो.
तेव्हा सध्या तालुक्याचे आमदार असताना असे प्रकार वारंवार घडत असल्याचे घडत आहे.
असे आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी बोलुन दाखविले.
या उदघाटन प्रसंगी हेस्काॅचे अधिकरी उपस्थित नव्हते. .केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी तालुक्यात उदघाटनाचे कार्यक्रम केल्याचे प्रकार दिसुन येत आहे.
भाजप पक्षात राहुन पक्षाच्या आमदाराच्या अनुपस्थित असे प्रकार करणे योग्य नाही.
असे मत त्यानी व्यक्त केेले.
पारिश्वाड क्राॅस वरील खड्डा ही केवळ माती टाकून आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या अनुउपस्थित भाजप कार्यकर्त्यानी व समाज सेवकानी खड्डा बुजविला. मात्र माती मुळे चिखलाचे साम्राज्य पसरले .लागलीच आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी सबंधीत पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्याची कान उघडणी करून पारिश्वाड क्राॅस वरील खड्ड्यात झालेला प्रवाशाना त्रासाचा होत आहे. लागलीच काळी खडी व मोरम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करून देण्यास सागीतले .
तालुक्यात भाजपच्या नेत्याकडुन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या मागे कामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार तालुक्यातील जनतेला दिसुन येते आहे. याचा धोका भाजप पक्षात होण्याचा संभव दिसुन येत आहे.