संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील तहसील कार्यालयात सालाबाद प्रमाणे यंदा ही गुरूवारी दि. १० रोजी हडपद आप्पणा जयंती उत्सवात साजरी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांच्याहस्ते हडप्पद आप्पणा यांच्या फोटो प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रतिमेला पुष्पहार घालुन पुजन केले.
यावेळी कार्यक्रमाला सामाज सेवक इराप्पा संपगावी तसेच उप तहसीलदार राकेश बुवा ,ग्रेट टू तहसीलदार के आर कोलकार ,प्रकाश कट्टीमणी,वैजू मागेरी,कर्मचारी मोसीन दर्गावाले,सुनील देसाई,मंजु संगमनावर,विनायक व इतर कर्मचारी उपस्थित होते.