- कै.अशोक यशवंत कदम्ब पाटील *
#मृत्यू दि.२१ -०७- २०२४!
संदेश क्रांती न्यूज :
गर्लगुंजी ( ता.खानापूर ) येथील देसाई गल्लीचे रहिवाशी व हाडाचे शेतकरी कै अशोक यशवंत कदम्ब पाटील याचे वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दि २१ जूलै रोजी निधन झाले.
#आज तिथी प्रमाणे गुरूवारी दि.१० रोजी प्रथम स्मृतिदिना निमित्त थोडक्यात परिचय !
“कै.अशोक यशवंत कदम्ब पाटील यांचा जन्म शेतकरी कुटूंबात झाला.
हानपाणापासुन शेतीची आवड होती.ऐन तारूण्यात वडिलाचे क्षेत्र हरपल्याने त्याच्यावर शेतीची जबाबदारी पडल्यामुळे ते शेतीव्यवसायाकडे वळले, काही काळ त्यानी दुध व्यवसाय ही केला.त्यावेळी सायकली वरून ते येळ्ळूरमार्गे बेळगांवला जाऊन दुध व्यवसाय केला.परंतु शेवट पर्यत शेतीव्यवसायात रमले.
ते गर्लगुंजी पी के पी एस सोसायटीचे संचालक म्हणून सेवा केली.
गल्ली,गावातील सार्वजनिक कार्यात ते पुढाकार घेऊन काम करत.लहान थोराशी मिळुन मिसळुन राहत असत.
त्याच्या आत्म्याला चिरशांती लाभो! हीच ईश्वर चरणी प्रार्थणा!
शोकाकुल:
पत्नि : श्रीमती जयश्रीअशोक कदम्ब पाटील
मुलगे: दत्ता ,दिपक.
मुलगी : सौ.राजश्री (दर्शना) भिमराव देसाई(हलशीवाडी)
सुना,नातवंडे व समस्त कदम्ब पाटील परिवार देसाई गल्ली गर्लगुंजी ,ता खानापूर.