#खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर याची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेंगळूर येथे मागास वर्गीय कल्याण सचीव आणि संगोळी रायण्णा प्राधिकरणाचे अध्यक्ष शिवराज एस तंगडगी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि . ९ रोजी बैठक पार पडली.
याबैठकीत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्राधिकरणाने हाती घेतलेल्या विविध कामावर चर्चा करण्यात आली.त्यानंतर अहवाल तयार करण्यात आला.
यावेळी येत्या १६ आँगष्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्याहस्ते विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या कामाचे उदघाटन व शंकु स्थापना कामाचा शुभारंभ होणार आहे.अशी माहिती देण्यात आली
यावेळी बैठकीला मागास वर्गीय कल्याण सचीव आणि संगोळी रायण्णा विकास प्राधिकरण अध्यक्ष शिवाराज एस तंगडगी, खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, बैलहोंगल तालुक्याचे आमदार महांतेश कौजलगी,गॅरेटी योजनेचे अध्यक्ष एच एम रेव्हणा व इतर विविध अधिकारी उपस्थित होते.