विविध मंत्र्यांच्याहस्ते होणार शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहराच्या शिवस्मारक चौकातील सरकारी दवाखाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या इंदिरा कँन्टीनचा शुभारंभ उद्या शनिवारी दि. २१ रोजी दुपारी १२ वाजता पालक मंत्री सतीश जारकिहोळी तसेच बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व इतर मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला मंत्री ,जिल्ह्यातील, खासदार,आमदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
खानापूर येथील इंदिरा कॅन्टीन मध्ये दररोज सकाळी नाश्ता १० रूपये तर जेवन १५ रूपयात मिळणार आहे.यात गोरगरीबांची चांगलीच सोय होणार आहे.त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.