#बेकवाड क्राॅस ते बिडी क्राॅस रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका व घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका म्हणून ओळखला जातो.त्यामुळे मुसळधार पावसाने रस्त्याची दुर्दशा होत आहे.
बेकवाड क्राॅस ते बिडी क्राॅस रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य!
खानापूर तालुक्यातील बेकवाड क्राॅस ते बिडी क्राॅस पर्यतच्या जवळ पास पाच किलो मीटर अंतराच्या रस्त्यावर दोन फुट खड्डे पडले आहेत.
त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविणे तारेवरची कसरत होत आहे.दुचाकी वाहन धारकाना या खड्ड्यातुन ये जा करताना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते.या खड्ड्यांचा अंदाज लागत नसल्याने आपघात होण्याचा संभव आहे.या खड्डयामुळे यामार्गावरील बससेवा उशीरा धावत आहे.
त्यामुळे याभागातील नागरीकानी रस्त्याच्या समस्ये बाबत सबंधीत खात्याच्या व लोकप्रतिनिधीच्या नावाने जोरदार निर्देशने करत रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावी.अशी मागणी केली आहे.

