#खानापूर संत गोरा कुंभार समाज अध्यक्ष भैरू कुंभार यांच्याहस्ते उदघाटन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पारिश्वाड क्राॅस जवळील श्रीमहालक्ष्मी को.आँप. बाजूला डॉ .दर्शन प.कुंभार यांच्या नूतन
“डॉ दर्शन मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकचा शानदार उदघाटन सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत निवृत्त मुख्याध्यापक रघुनाथ उत्तुरकर यानी केले.
नूतन डाॅ.दर्शन मल्टी स्पेशालिस्ट क्लिनिकचे उदघाटन खानापूर तालुका संत गोराबा कुंभार समाजाचे अध्यक्ष भैरू कुंभार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले
यावेळी समारंभाला निवृत्त मुख्याध्यापक रघुनाथ उत्तुरकर,राजू कुंभार तोपिनकट्टी,श्री निडगलकर माजी सैनिक झाड अंकले, परशराम कुंभार, जगदीश कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी उदघाटन प्रसंगी बोलताना खानापूर तालुका संत गोराबा कुंभार समाजाचे अध्यक्ष भैरू कुंभार म्हणाले की, फुलेवाडी( डुक्करवाडी) सारख्या छोट्या गावातील गरीब कुंभार कुटूंबातुन शिक्षण घेऊन पहिला पदवीधर डाॅक्टर होण्याचा मान डाॅ.दर्शन कुंभार याला मिळाला.त्याने आपल्या गावासह खानापूर तालुक्यातील जनतेची सेवा करून उत्तम डाॅक्टर म्हणून नाव मिळावावे.अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरानी शुभेच्छापर आपले विचार व्यक्त केले.
शानदार उदघाटन समारंभाला खानापूर.डुकरवाडी.कुप्पटगिरी परिसरातील नागरिक , मित्रपरिवार उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार निवृत्त मुख्याध्यापक आर के उत्तुरकर यानी मानले.



