#खानापूर विठ्ठल मंदिरात भजनाचा कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सा ला बाद प्रमाणे यंदा ही खानापूर शहरासह तालुक्यात आषाढी एकादशी सन शनिवारी दि.२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
खानापूर शहरातील विठ्ठल देव मंदिरात पहाटे विठ्ठल रुक्मिणी मुर्तीना अभिषेक घालुन विधीवत पुजा करण्यात आली. सकाळ पासुन विठ्ठल मंदिरात भक्तानी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.दुपार पासुन संध्याकाळ पर्यत भक्तांच्या अभंगाच्या सुरानी मंदिर संगीतमय झाले होते. यावेळी महिलानी भजन कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता.
आषाढी एकादशी निमित्त दिवसभर विठ्ठल भक्तानी मंदिर फुलून गेले होते.
तालुक्याच्या अनेक गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तीभावाने आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
