#केंद्रीय निरीक्षक श्रीगजेशमांद्रेकर यांचे ‘सेवा’ विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन!
खानापूर प्रतिनिधी
प.पूज्य सद्गुरु ब्रह्मेशांदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज रामगुरवाडी ईदलहोंडचा सेवारंभ उत्सव शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी श्री वैजू गुरव यांच्या ‘सानंद’ निवासस्थानी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. यावेळी संत समाज रामगुरवाडी इदलहोंडची नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमास केंद्रीय सेवक श्रीराज शेलार, गजेश मांद्रेकर व विश्वजीत गावस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सद्गुरू प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर केंद्रीय सेवकांनी ‘सेवा’ या विषयावर मार्गदर्शन करताना सेवेचे महत्त्व, शिष्यत्व, सद्गुरूभक्ती आणि अध्यात्मिक जीवनाची आवश्यकता यावर सखोल विवेचन केले.
यानंतर केंद्रीय सेवक श्रीराज शेलार यांनी संत समाज रामगुरवाडी ईदलहोंड नूतन कार्यकारिणीची घोषणा केली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे !
अध्यक्ष :विश्वनाथ सुतार , उपाध्यक्ष – कु दत्ता बाचोळकर ,
सचिव : . टोपान्ना गुरव, सहसचिव – सौ मीना उत्तूरकर खजिनदार: नामदेव गुरव , सहखजिनदार :सचिन गुरव,
सदस्य – कु भरमाणी गुरव , परशराम पाटील व बाळाराम कुलम .
केंद्रीय सेवेकऱ्यांच्या हस्ते गोड भरवून सेवारंभ उत्सव साजरा करण्यात आला. सद्गुरू महाआरती आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास संत समाज रामगुरवाडी,इदलहोंडचे सर्व गुरुबंधू भगिनी, तालुकाप्रमुख उपस्थित होते.