खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी (ता.खानापूर) गाव तालुक्यात लोकसंख्येच्या मानाने मोठे आहे.या गावात अनधिकृतपणे सुरू असलेला दारू विक्री लागलीच बंद करा, गावातील शांतता व कायदा सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी कठोर कारवाई करावी.अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी ग्राम विकास समिती व ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्ह्या पोलिस प्रमुख रामगोंड बसरगी याना देण्यात आले.
निवोदनात म्हटले आहे, की, गर्लगुंजी गावात अनधिकृतपणे सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे युवकामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे.युवक दारूच्या नशेत महिलाना, लहान मुलाना तसेच नागरीकाना त्रास दिला जात आहे.काही युवक शाळेच्या परिसरात दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोडत असल्याने विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असुन काचेच्या बाट्ल्याच्या तुकट्यामुळे दुखापत व आपघात होण्याचे भिती व्यक्त होत आहे.
एवढेच नव्हे तर गर्लगुंजी नंदीहळ्ळी रस्त्यावर मद्यपीकडुन दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घाालणे,महिलाशी असभ्य वर्तन करणे, दारूच्या रिकाम्या बाटल्या शेतात रोकने असे प्रकार घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तेव्हा पोलिस खात्याने गर्लगुंजी परिसरात नियमित गस्त घालुन मद्यपीवर कठोर कारवाई करावी.व गावात अनधिकृत दारूविक्रि तातडीने बंद करावी, अशी मागणी केली आहे.
निवेदन देताना माजी ग्राम पंचायत अध्यक्ष गोपाळ पाटील,माजी तालुका पंचायत सदस्य. पांडुरंग सावंत,मा जी ग्राम पंचायत सदस्य हणमंत मेलगे, परशराम चौगुले,अजित पाटील, प्रसाद पाटील, सुरेश मेलगे,बजरंग दल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूूरकर,पी के पी चेअरमन संजय पाटील,माजी चेअरमन राजू सिध्दाणी, संचालक शांताराम मेलगे,विनोद कुंभार,शिवाजी कोलकार, गंगाराम वडेबैलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.