संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
पणजी बेळगाव महामार्गावरील लोढा ते संगरगाळी पर्यतच्या रस्त्यावर नुकताच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे.
त्यामुळे खड्ड्यातुन बस ,आवजड वाहने ये जा करताना तारेवरची कसरत होत आहे.त्यामुळे अनेक आवजड वाहने रस्त्यात अडकुन पडत आहेत.
कंत्राटदाराचे सर्व्हीस रोड कडे दुर्लक्ष!
पणजी बेळगाव महामार्गावरील गुंजी ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हीस रोडची दुरावस्था झाली आहे. यारोडवर इतके खड्डे पडले आहेत.की, लोंढा खानापूर बस वाहतुक बंद होण्याची वेळ आली आहे.आवजड वाहने खड्डयामुळे अडकून पडण्याची शक्यता आहे.तेव्हा संबधीत कंत्राटदाराने गुंजी ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हिस रोडवरील खड्डे बजवुन या रस्त्यावरील वाहतुक सुरळीत करावी.
प्रतिक्रिया:
गुंजी गावापासुन संगरगाळी गावापर्यतच्या सर्व्हिस रोड वर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीला योग्य करावा.जेने करून लोंढा खानापूर बससेवा सुरळीत सुरू व्हावी.अन्यथा या रस्त्यावरील खड्डयाकडे संबंधित कंत्राटदाराने दुर्लक्ष केले तर रस्त्यावर उतरून जाब विचारण्यात येईल.,तेव्हा तालुक्याच्या आमदाराने गुंजी ते संगरगाळी पर्यतच्या सर्व्हिस रोड वरील खड्डयाची पाहणी करून समस्या दुर करावी.
पंकज कुट्रे सामाजिक कार्यकर्ते गुंजी