“विद्यार्थ्याच्याहस्ते केले वृक्षारोपण “
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप (ता. खानापूर ) येथील पुर्व प्राथमिक मराठी शाळेत वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पार पडला.
या वृक्षारोपण कार्यक्रमात विद्यार्थ्यानी मोठया उत्साहाने सहभाग दर्शविला.
शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुंभार यानी विद्यार्थ्याना वृक्षारोपणचे महत्व सांगुन झाडे लावा आणि झाडे जगवा.असा संदेश देत प्रत्येकाने एक तरी झाड लावुन ते जगवा.तरच निसर्ग टिकेल.निसर्ग टिकला तर पाऊस पडेल, पाऊस पडला तर पाण्याचा प्रश्न मार्ग लागेल.तेव्हा झाडे लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.अशी माहिती दिली.
यावेळी शाळेच्या आवारात विद्यार्थ्यानी विविध जातीच्या झाडांची रोपे लावुन आनंद व्यक्त केला. प्रत्येक रोपाची जोपसणा करून ती वाढविण्याची प्रतिज्ञा केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिथि शिक्षक नामदेव कुंभार यानी केले.तर आभार कन्नड शिक्षिका सौ एल डी नलवडी यानी मानले.