खानापूर प्रतिनिधी
खानापूर महाराष्ट एकीकरण समितीचे
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे बंधु निवृत्त पोस्ट मास्तर. मारुती नारायण दळवी (वय .६८)( रा. मंणतुर्गा) यांच्या दुचाकीचा सोमवार दि. २२ रोजी शिवाजी-नगर येथे अपघात झाला होता.
आपघातानंतर त्यांना उपचारासाठी बेळगांव येथील केएलई दवाखान्यांमध्ये दाखल केलेले होते.
परंतु आज मंगळवारी दि. २३ रोजी उपचारा दरम्यान प्रतिसाद न मिळाल्याने दुपारी ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यविधी आज रात्री ८ वाजता मंणतुर्गा येथे होणार आहेत.
त्याच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मुलगे,एक विवाहित मुलगी, सुना,जावई ,भाऊ असा परिवार आहे.