खानापूर प्रतिनिधी
खानापूर महाराष्ट एकीकरण समितीचे
सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे बंधु मारुती नारायण दळवी वय ६८ ( रा. मंणतुर्गा) यांच्या दुचाकीचा सोमवार दि. २२ रोजी शिवाजी-नगर येथे अपघात झाला होता.
आपघातानंतर त्यांना उपचारासाठी बेळगांव येथील केएलई दवाखान्यांमध्ये दाखल केलेले होते.
परंतु आज मंगळवारी दि. २३ रोजी उपचारा दरम्यान प्रतिसाद न मिळाल्याने दुपारी ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यविधी आज रात्री ८ वाजता मंणतुर्गा येथे होणार आहेत.
त्याच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, भाऊ असा परिवार आहे.