#येणार्या पावसाळ्यात पॅचवर्क वाहुन जाण्याची भिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील इदलहोंड अंकले रस्त्याचे डांबरीकरण होऊन वर्षो ओलांडले नाही.तेच रस्त्यावर जागोजागी खड्याचे साम्राज्य पसरले याची दखल घेऊन संदेश क्रांती न्यूज मधुन बातमी प्रसिध्द होताच नुकताच इदलहोंड अंकले रस्त्याचे पॅचवर्क कामाला सुरूवात झाली.
इदलहोंड गावापासुन केवळ तीन किलोमीटर अंतराच्या पॅचवर्क कामाला सुरूवात झाली.मात्र पॅचवर्क म्हणजे केवळ खड्डयात खडी पसरविण्यात आली.मात्र त्यावर रोलर फिरवला नसल्याने काही दिवसात पावसाच्या सुरूवातीलाच खड्ड्यातील खडी वाहुन जाण्याची भिती व्यक्त होत आहे.
गणेबैल टोलनाका चुकविण्यास रस्त्याचा उपयोग!
बेळगांव पणजी महामार्गावरील गणेबैल टोलनाक्यावर टोल भरावा लागतो.यासाठी इदलहोंडमार्गे अंकले रस्त्याने वाहनधारकांची या जा सुरू असते. त्यामुळे आवजड वाहनामुळे रस्त्याची दुरावस्था झाली.
तेव्हा संबधीत कत्राटदाराने या रस्त्याचे पॅचवर्क चांगल्या दर्जाचे करावे.अशी मागणी याभागातील नागरीकातुन होत आहे.