#गर्लगुंजी(ता.खानापूर) गावचे सुपूत्र!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
पुणे येथील आशा विद्यालय, (खेसे पार्क, लोहगाव, )शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व गर्लगुंजी (ता.खानापूर) गावचे सुपूत्र अजित पाटील यांना भारतीय सैन्यदलातील माजी सैनिकांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून प्रतिष्ठित “Veteran Achievers Award” प्रदान करण्यात आला. हा सन्मान Chief of Army Staff (COAS) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार म्हणजे देशसेवा, नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान केवळ पाटील यांच्या कार्याचा गौरव नसून आशा विद्यालय परिवार तसेच संपूर्ण लोहगाव परिसरासाठी अभिमानाची बाब आहे.
अजित पाटील साहेब यांनी शिक्षण, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेम या क्षेत्रांत केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्टतेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आशा विद्यालय परिवार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यावतीने अजित
पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
“हा सन्मान संपूर्ण आशा विद्यालय परिवारासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.”
या पुरस्काराने गर्लगुंजी ( ता.खानापूर ) परीसरातुन अजित पाटील यांचे आभिनंदन होत आहे.