#मागील ११ वर्षात प्रामाणिक सेवा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर कृषी अधिकारीपदी ( कृषी सहाय्यक संचालक) डी बी चव्हाण हे पुन्हा रूजू झाले. त्यानी नुकताच पदभार स्विकारला. या निमित्त खानापूर पत्रकारांच्यावतीने कृषी अधिकारी डी बी चव्हाण यांचे बुधवारी दि.३ रोजी कृषी खात्याच्या कार्यालयात गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कृषी अधिकारी डी बी चव्हाण यांची ११ वर्षे सेवा!
गेल्या ११ वर्षात कृषी अधिकारी डी बी चव्हाण यानी खानापूर तालुक्यात प्रामाणिक सेवा बजावली.शेतकरीवर्गाला सरकारच्या विविध कृषी योजना तसेच विविध सबसीडी बी बीयानाचे वाटप,आधुनिक शेती अवजारे तसेच ठिबक सिंचन योजना त्यानी खानापूर तालुक्यात प्रभावी राबविल्या.
आपत्ती काळात शेतकर्याच्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई वेळेत देऊन शेतकर्याना मोठे सहकार्य केले.
#कृषीअधिकारी डी बी चव्हाण याना राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी अधिकारी पुरस्कार!
खानापूर कृषी अधिकारी डी.बी.चव्हाण यानी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात विशेष नावलौकीक मिळविला आहे.त्यांच्या या उत्कृष्ट कामगीरी बद्दल त्याना सरकारचा राजस्तरीय उत्कृष्ट कृषी अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कृषी अधिकारी डी बी चव्हाण यांची खानापूर तालुका कृषी अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ति झाल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गातुन समाधान पसरले.
तसेच खानापूर पत्रकारांच्यावतीने गुलाब पुष्प दे ऊन स्वागत केले.यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश देशपांडे, पिराजी कुर्हाडे,वासुदेव चौगुले, सुहास पाटील, प्रसन्ना कुलकर्णी तसेच अधिकारी सौ.दिपा आदी उपस्थित होते.