नूतन एसीएफ बसवराज वाळद.
नूतन एसीेएफ बसवराज वाळद यांचे स्वागत, तर एसीएफ सुनीता निंबर्गी याना बदलीनिमित्त निरोप!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूरचा अरण्याविभाग हा कर्नाटकात चांगल्या दर्जाचा आहे. अरण्यविभागाचा विस्तार फार मोठा आहे. तेव्हा खानापूरच्या आरण्यविभागाला डीएफओ दर्जा मिळवा.यासाठी मी खानापूरच्या आरण्याचा विस्तार वाढविण्यासाठी व दर्जा वाढविण्यासाठी मी एसीएफ यानात्याने सातत्याने प्रयत्न करीन.या आदी ही मी नागरगाळी, लोंढा, खानापूरात आरएफओ म्हणून जवळपास आठ वर्षे सेवा बजावली आहे.तेव्हा या खानापूर
तालुक्याच्या आरण्यविभागाच्या विकासा साठी एसी एफ या पदावर कार्यरत राहुन विकास साधेन.असे विचार खानापूरचे नूतन एसीएफ बसवराज वाळद यानी शुक्रवारी खानापूर येथील वन खात्याच्या कार्यालयात स्वागत व निरोप समारंभात अध्यक्ष
या नात्याने बोलता ना व्यक्त केले.
खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबर्गी यांची धारवाड़ येथे बदलीनिमित निरोप व खानापूरचे नूतन एसीएफ बसवराज वाळद यांचे स्वागत असा संयुक्त कार्यक्रम पार पडला.
व्यासपिठावर एसीएफ सुनीता निंबर्गी, नूतन एसीएफ बसवराज वाळद, प्रोफेसनली एसीएफ श्रीमती बिरादार , आरएफओ श्रीकांत पाटील,
देवेंद्र पठान, तेज वाय बी, माने आदी उपस्थित होते.
,प्रारंभी एसीएफ सुनिता निंबर्गी व नूतन एसीएफ बसवराज वाळद यांचा खानापूर ,लोंढा,नागरगाळी, कणकुंबी आदी रेंज आँफिसच्यावतीने तसेच खानापूर शहरातील विविध मान्यवरांच्या वतीने शाल, पुष्पहार व भेट वस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.आरएफओ श्रीकांत पाटील यानी आभार मानले.


