#शाळेच्या कार्यात सिंहाचा वाटा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता. खानापूर ) येथील शिक्षणप्रेमी, समाज सेवक म्हणून ज्याच्या कडे पाहिले जाते. ते म्हणजे चिंतामणी शिवानंद तिरक्कणावर होय.
कोणत्याही पदाची,खुर्चीची अपेक्षा न करता सिंगीनकोप गावच्या सार्वजनिक विकास कामात, शाळेच्या कामात नेहमीच पुढाकार घेऊन अंगावर पडेल ते काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती व कोणतीच अपेक्षा न बाळगणारे व्यक्तित्व म्हणजे चिंतामणी होय.
नुकताच शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असताना स्वताच्या मर्जीने मराठी व कन्नड सरकारी पूर्व प्राथमिक शाळेच्या आवारात स्वताहुन स्वच्छता करण्यासाठी पुढे होणारे चिंतामणी नेहमीच दिसतात.शाळेमध्ये पाण्याची सोय व्हावी. यासाठी कटाक्षाने लक्ष देणारे, शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमात स्वताहुन पुढाकार घेणारे, स्वताच्या मुलाप्रमाणे शाळेच्या मुलाना लळा लावणारे, म्हणजे चिंतामणी तिरक्कणावर होय.
गावच्या सामाजिक कार्यक्रमात तसेच गावच्या उत्सवात त्याचा नेहमीच सह भाग असतो.
असे शिक्षणप्रेमी व समाज सेवक चिंतामणी तिरक्कणावर यानी नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन मदत केली.याबद्दल या शिक्षणप्रेमी चिंतामणी यांचे कौतुक होत आहे.

