#३८वर्षे ग्राम सहाय्यक सेवाबजावली!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर येथील तहसील कार्यालयात सन १९८८ साली वीरभद्र चिन्नापा जवळी हे ग्राम सहाय्यक म्हणून सेवेत रुजू झाले. आज गेली ३८ वर्षे त्यानी ग्रामसहाय्यक म्हणून प्रामाणिक पणे सेवा बजावत शनिवारी दि.३० रोजी सेवानिवृत्त झाले.
या निमित्त त्याचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा शनिवारी खानापूर तहसील कार्यालयात मोठ्या थाटामाटात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रेड टू तहसीलदार एस के तंगोळी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपतहसीलदार श्री कट्टीमणी, श्री मांगेरी आदी उपस्थित होते.
यावेळी सेवानिवृत्ती ग्राम सहाय्यक वीरभद्र जवळी यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रेड टू तहसीलदार एस के तंगोळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पहार व भेटवस्तू देऊन मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त सत्कार सोहळ्याला तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

