#शेतकर्याचे हजारो रूपयाचे नुकसान!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
डिगेगाळी-जटगे (ता. खानापूर) परिसरात जंगली प्राण्याचा वावर वाढलाअसुन शुक्रवारी दि.१२ रोजी जटगे गावापासुन जवळच असलेल्या शेतात भर दिवसा वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना घडली.
भर दिवसा घडलेल्या घटनेमुळे याभागातील शेतकरीवर्गातुन भितीचे वातावरण पसरले आहे.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, जटगे (ता. खानापूर) येथील शेतकरी राजाराम पाटील हे पेरणीचे हंगाम असल्याने शुक्रवारी जोत घेऊन आपल्या शेतात कामासाठी गेले होते, दुपारी बैलाला चारावयास सोडले होते.चरणार्या बैला वर जंगलातील झुडूपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बैला वर झडप घातली. त्यात बैल जागीच ठार झाला.
याघटनेची माहिती मिळताच वनखात्याच्या अधिकार्यानी व कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला.
या घटनेमुळे शेतकरी राजाराम पाटील यांचे हजारोचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्याशेतकर्याला सरकारकडुन आर्थिक मदत मिळावी .अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.
डिगेगाळी ,जटगे भागात घनदाट जंगल असल्याने याभागात जंगली प्राण्याचा वानर वाढला आहे.काही लोकाना वाघाचे दर्शन ही झाल्याचे सागण्यात येत आहे.त्यामुळे शेतकरीवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तेव्हा शेतकर्यानी शेतात काम करताना किंवा जनावरे चारावयास घेऊन जाताना विशेष,खबर दा री घ्यावी.असे आवाहन वनखात्याने केले आहे.

