#वापराअधिच निकृष्ट दर्जा!२४ लाखाचा निधी वाया जाण्याची भिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील आमदार शाळेत ( के.बी एस )शाळेत गेल्या दोन वर्षापासुन २४ लाख रूपयाचा निधी वापरून बांधकाम करण्यात आलेल्या शौचालय,व मुतारीची दुरावस्था झाली असुन अद्याप वापरातन आल्याने विद्यार्थी व पालकवर्गात नाराजी पसरली असुन शाळा सुधारणा कमिटीने या बाबत आमदारानी लक्ष देऊन दर्जा पाहावा.अशी मागणी केली आहे.
दोन वर्षाचा कालावधी तरी ही काम अर्धवट!अद्याप वापर नाही.
गेल्या दोन वर्षापासुन केवळ शौचालय व मुतारीचे काम पुर्णत्वाकडे गेले नाही.अजुन ही शौचालय, मुतारी वापरात नाही.त्यामुळे सबंधीत कंत्राटदाराचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थीती निर्माण झाली आहे.असे एस डी एम सी अध्यक्षाचे म्हणने आहे.
तालुक्यात जास्त विद्यार्थी असलेली शाळा!
खानापूर तालुक्यातील एकमेव आमदार शाळा म्हणजे के.बी.एस शाळा म्हणून. पाहिली जाते.या शाळेत तालुक्यातच जास्त विद्यार्थी असलेली शाळा म्हणून ओळख आहे.अशा शहरातील शाळेच्या विकासाकडे आमदारांचे व अधिकार्याचे दुर्लक्ष झाल्याने ही कामाची परिस्थीती झाल्याची एस डी एम सी कमिटीचे म्हणने आहे. या बाबत अनेक समस्या आहेत.आजुन शौचालय,मुतारी वापरात दिले नाही.यासाठी कामाचा दर्जा तपासावा अशी मागणी विद्यार्थी, पालक, व शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने होत आहे.
