#मंगळवार पासुन प्रारंभ!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराचे ग्रामदैवत श्री मर्याम्मा देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे यंदाही मंगळवारी दि.९ व बुधवारी दि.१० असे दोन दिवस साजरी होत आहे.
मंगळवारी यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला असुन मंगळवारी सकाळी ७ वाजता श्री मर्याम्मा देवीला अभिषेक व गार्हाणे घालुन यात्रेची सुरूवात झाली.त्यानंतर दिवसभर देवीला ओट्या ,नैवेद्य अर्पण करण्यात आले.
मंगळवारी सकाळपासुनच भाविकांची तसेच सुवासिनी ओटी भरण्यासाठी मंदिरात मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मर्याम्मा मंदिराच्या आवारात भाविकानी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
मंदिरासमोरूनच बेळगांव पणजी महामार्ग असल्याने वाहनाची मोठी गर्दी होऊ नये यासाठी खानापूर बेळगाव बसेस व आवजड वाहने पारिश्वाड मार्गे सोडण्यात आली होती. त्यामुळे वाहनाच्या रहदारीचा यात्रेत कोणताच त्रास झाला नाही.यावेळी पोलिसाचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
उद्या बुधवारी सकाळी १०.३० वाजता गार्हाणे घालुन धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहे. रात्री १० वाजता मर्याम्मा देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे.
या मर्याम्मा देवीच्या यात्रेला खानापूर शहरासह बेळगाव जिल्ह्यतुन तसेच महाराष्ट्र ,गोवा राज्यातुन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
भाविकासाठी विविध साहित्याची दुकाने तसेच लहान मुलासाठी खेळण्याची दुकाने, पाळणे आ दी ची सोय करण्यात आली आहे.
