#गंभीर जखमी!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील हुलंद गावच्या शेतकर्यावर बुधवारी दि .१० रोजी सायंकाळच्यावेळी अस्वलाचा हल्ला झाल्याने शेतकरी महेश गावडे (वय.२५) हा गंभीर झाला आहे.
सध्या पावसाळ्याला सुरूवात झाली आहे.त्यामुळे जंगली प्राणी बाहेर पडतात.शेतकरी महेश गावडे सायंकाळी घरी येत असतााना,अचानक अस्वलाने हल्ला केला.त्यांच्या उजव्या पायाचा लचका काढल्याने ते गंभीर जखमी झाले..
_ घटनेची माहिती मिळताच एसी एफ बसवराज वाळद यानी सहकार्याना घटनास्थळी पाठवून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी दवाखाण्याला पाठविण्यात आले.
