#रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गोल्याळी ( ता. खानापूर) गावापासुन जवळपास ६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुर्दशा झाली असुन येत्या पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे गोल्याळी गावची बससेवा बंद होण्याच्या संकटात आहे.
बोकनुर (ता बेळगाव) गावापासुन आपल्या हद्दीतील एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण मा जी मंत्री ,आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याप्रयत्नाने झाले आहे.मात्र खानापूर तालुक्यातील गोल्याळी गावापासुन जवळपास सहा किलोमीटर अतरांच्या रस्त्याची दुर्दशा झाली.
खानापूरच्या आमदारानी याकडे दुर्लक्ष केल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. असे मत गोल्याळीचे नामदेव गुरव यानी स्पष्ट केले.
तेव्हा गोल्याळी रस्त्याची पावसाच्या आदी डागडुजी करावी. अशी मागणी गोल्याळी ग्रामस्थातुन होत आहे.
