#गावकर्याच्यावतीने सत्कार सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गे गावचे सुपुत्र,उत्कृष्ट गायक सुराप्पा कृष्णा पाटील टपाल खात्याच्या पोस्टमन सेवेतून सेवा निवृत्त झाले .
त्यानिमित्त श्री महारुद्र नागेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त मणतुर्गे गावची पंच कमिटी, श्री बालशिवाजी संगीत भजन मंडळ व सूर्योदय सांस्कृतिक कलामंचच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी अविनाश नारायणराव पाटील, .सुधीर पाटील चेअरमन, नारायण पाटील सेक्रेटरी .अमृत महादेवराव शेलार चेअरमन अर्बन बँक खानापूर यांनी आपल्या भाषणातून म्हणाले ज्यांच्या नावातच सुर आहे असे हे सुराप्पा उत्तम गायक आहेतच ,शिवाय यांनी केलेली प्रामाणिक सेवा व गावांसाठी दिलेले योगदान, संगीत सेवा ही मोठी असून त्यांच्या भावी जीवनाबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या. प्रल्हाद मादार साहित्यिक, पत्रकार यांनीही त्यांच्या टपाल खात्यामध्ये केलेल्या सेवेचा व संगीत क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या. फोंडू सुतार यांनी संगीत क्षेत्रातील आठवणी करून त्यामध्ये त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. सत्काराला उत्तर देताना सुराप्पा पाटील म्हणाले ; आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने टपाल खात्यामध्ये पोस्टमन सेवा उत्तमप्रकारे करु शकलो, व यापुढेही समाजात माझे कार्य असेच चालु ठेवून संगीत सेवाही करत राहिन. असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाला पंचकमिटी,श्री महारुद्र नागेश मंदिर देवस्थान कमिटी, पदाधिकारी, गावातील संगीत प्रेमी, ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन.एम. व्ही. चोर्लेकर यांनी केले तर आभार विलास गा.पाटील यांनी मानले.
