संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गिरीजन सुरक्षा मंचतर्फे रविवारी दि.२४ रोजी दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात गिरीजन सांस्कृतिक भव्य शोभा यात्रा आणि सांस्कृतिक संमेलन होणार आहे. अशी माहिती मंचचे प्रांत समन्वयक धोंडू पाटील यानी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी गिरीजन सुरक्षा मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती निमित्त दिल्लीत कार्यक्रम होत आहे.या संमेलनात देशातील विविध राज्यातुन मोठ्या संख्येने गिरीजन समाजबांधव आपल्या पारंपरिक वेश भूषेत सहभागी होणार असुन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेला गिरीजन सुरक्षा मंचाचे प्रांत समन्वयक धोंडू पाटील , मंचाचे प्रमुख बम्मू पाटील, लक्ष्मी जैन व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
