“उद्यापासुन कार्यक्रमाला सुरूवात”
#पहिल्या दिवशी पुन:प्राणप्रतिष्ठापणा सोहळा!
#दुसर्या दिवशी मंदिराचा लोकार्पण सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
नागुर्डा ( ता.खानापूर ) येथील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या नागेश महारूद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा व वाचनालय अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागुर्डा ,नागुर्डावाडा, विश्रांतवाडी आदी गावचे ग्राम दैवत असलेल्या नागेश महारूद्र मंदिराचा लोकार्पण सोहळा गुरूवार दि.१४ ते शनिवारी दि.१६ पर्यत होत आहे.
गुरू वा री सकाळी ९ वाजता बाळेवाडी मठाचे मठाधीश प पू पीर योगी सिंगनाथजी महाराज यांच्या दिव्य सानिध्यात कळसरोहन,श्रीगणेश मुर्ती,नंदी मुर्ती, व कासव प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा ,तुळस पुजन होणार आहे.
यावेळी श्री नागेश महारूद्र पुन:
प्राणप्रतिष्ठापणा सौ व श्री निंजनसिंह सरदेसाई यांच्याहस्तेहोणार आहे.तसेच विविध देवदेवतांच्या मुर्तीप्रतिष्ठापणा व मुख्य प्रवेश व्दार , चौकट पूजन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
शुक्रवारी मंदिराचा लोकार्पण सोहळा!
शुक्रवारी सकाळ १० वाजता मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंजन सिंह सरदेसाई हजर असतील,मंदिर प्रवेशव्दाराचे लोकार्पण आमदार रोहित आर.आर.पाटील यांच्याहस्ते होणार आहे.गाभार्याचे लोकार्पण आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याहस्ते होणार आहे.तर दिपप्रज्वलन मा जी आमदार दिगंबर पाटील, अरविॆद पाटील,सौ.अंजली निंबाळकर, मनोहर किणयेकर,प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुसकर,गोपाळ देसाई आदीच्याहस्ते होणार आहे.
तर रात्री भजन कीर्तन चा कार्यक्रम होणार आहे.
#शनिवारी मनोरंजन सांस्कृतिक कार्यक्रम!
शनिवारी रात्री डाकू संग्राम नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी गुणी विद्यार्थ्याच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

