संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खैरवाड ( ता.खानापूर ) येथील श्रीमहालक्ष्मी मंदिर गाभारा चौकट पुजन रविवारी दि.१९ रोजी सकाळी ११ वाजता अक्षयतृतीयाच्या शुभमूहर्तावर आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमहालक्ष्मी मंदिर जिर्णोध्दार कमिटीचेअध्यक्ष रूक्माणा झुंजवाडकर उपस्थित राहणार आहेत.
तर चौकट पुजन आमदार विठ्ठल हलगेकर,एम.एल.सी चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते होणार आहे.दीपप्रज्वलन माजी आमदार दिगंबर पाटील,सौ.अंजली निंबाळकर,गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई आदीच्याहस्ते होणार आहे.विविध फोटोचे पुजन समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी,प्रकाश चव्हाण, अमृत शेलार,विलास बेळगावकर,जयराम देसाई,अँड.ईश्वर घाडी,सदानंद पाटील,आदीच्याहस्ते हो मार आहे.
यावेळी कार्यक्रमाला विविध मान्य वर उपस्थित राहणार आहेत.
रविवारी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे.तर सायंकाळी ७ वाजता शिवरायांच्या चरित्र्यावर शिक्षक विनायक चौगुले व बजरंग धामणेकर यांचे व्याख्यान होईल.
तरी कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमहालक्ष्मी जिर्णोध्दारकमिटीच्यावतीने तसेच ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

