संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेसच्यावतीने गुरूवारी दि.१६ रोजी रौडीशिटर व पोलिस यांच्या अभद्र युती संदर्भात तहसीलदाराना नि वे देन दे न्यास आले.
निवेदन देताना खानापूर तालुका ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी म्हणाले की,
तालुक्यातील जनतेने विचारवंत, शिक्षक, शिक्षित उच्चशिक्षित, वारकरी, समाजप्रबोधनकार यांना प्रबोधन करण्यासाठी बोलवावे
की राऊडी शिटर ना असा प्रश्न पडला आहे.
समाज म्हणून आपण वावरताना कोणाला प्रबोधनासाठी आपल्या गावात बोलविले पाहीजे याचा पण तालुक्यातील जनतेने इथून पुढे विचार केला पाहीजे असे परखड मत खानापूर ब्लॉक कॉंग्रेस चे अध्यक्ष ॲड घाडी यांनी मांडले. यावेळी ते म्हणाले की
सध्या तालुक्यात राऊडी शिटर व पोलीस यांची अभद्र युती झाली असल्याचे दिसून येत आहे.
कमीत कमी पोलीस प्रशासनास हे कळाले पाहीजे की आपण कोणाचे ग्लोरीफाकेशन करतोय असे ही ते म्हणाले .
माजी नगरसेवक लक्ष्मण मादार म्हणाले की तालुक्यात जे काय हे चालले आहे पोलीस प्रशासन जे काय करतयं ते अतिशय चुकीचे असून डॉ . बाबासाहेबांचे संविधान पायदळी तुडविण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे असा घणाघात केला.
सध्या तालुक्यात राऊडी शिटरचे उदो उदो करण्यात समाज गुंग झाल्याचे विचित्र चित्र दिसून येत आहे. समाजात अनेक विचारवंत, बुद्धीजीवी लोक असताना कोणी एका राऊडी शिटर ला लोकं ऐकत बसतात, हे समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा तालुक्यातील जनतेने व विचारवंतांनी, वारकरी मंडळींनी, बिद्धीजीवी माणसांनी विचार करण्याची वेळ आली आहे.
आता खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेस राऊडी शिटर व पोलीस यांची अभद्र युती लोकशाही मार्गाने मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही.
जे जे यासंदर्भात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहीजे ही मागणी गृहमंत्री यांचेकडे केली जाईल व पाठपुरावा केला जाईल. असा इशारा निवेदनाव्दारे केला.
यावेळी उपतहसीलदार एस के तिंगोळी यानी निवेदनाचा स्विकार केला.
यावेळी निवेदन देताना खानापूर तालुका ब्लाॅक क्राॅग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी, शहर अध्यक्ष महांतेश राऊत, नेते सुरेश जाधव,माजी नगरसेवक लक्ष्मण मादार,तोहिद चांदखन्नावर, ईश्वर बोबाटे,सुरेश दंडगल,काॅग्रेस नेत्या सावित्रि मादार, आदी शेकडो काॅग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
