{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नेहमीच येतो पावसाळा मात्र खेड्डे बुजविण्याकडे खानापूरातील संबधीत पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्यानी या खड्ड्याकेड कानाडोळा केला आहे.
खानापूर शहरापासुन जवळ असलेल्या पारिश्वाड क्राॅसवरील स्वा मिलच्या बाजूल पडलेले खड्डे मात्र कुणाचा तरी जीव घेतल्या नंतर संबधीत पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्याना जाग येणार काय? असा सवाल खानापूर पारिश्वाड रोडवरून प्रवास करणार्या प्रवाशातुन होताना दिसत आहे.
ही परिस्थिती पाहता खानापूर तालुक्याच्या पी डब्लूडी खात्याच्या अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत.त्याना अर्ज ,विनंत्या करून ही काहीच फरक पडत नाही.त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दुरावस्था झाली .
# रूमेवाडी क्राॅस ते करंबळ क्राँस रस्त्याची ही अवस्था!
खानापूर तालुक्यातील रस्त्याबरोबर आता रूमेवाडीक्राॅस ते कंरबळ क्राॅसपर्यतच्या रस्त्याची ही काही वेगळी आवस्था नाही. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याच रस्त्यावरून सामान्यासह राजकरणीही येजा करतात त्यानाही खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोच आहे
आम.विठ्ठलराव हलगेकर यानी रस्त्यसाठी
निधी मंजुर केला आहे!
खानापूर शहरांतर्गत मराठा मंडळ पदवी महाविद्यालय ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्यासाठी निधी मंजुर केला आहे. त्यासाठी करंबळ क्राॅसजवळ एक प्लांट ही पडला आहे. परंतु मुसळधार पावसाने सुरूवात कोली असुन उसंतही दिली नाही. आणि हे काम सुरू होताच थांबले आहे.
त्यामुळे यंदाही रस्त्यातील खड्ड्याशी सामना करण्याची वेळ खानापूर तालुक्यातील जनतेच्या नशीबी आले आहे.