संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेळगाव गोवा महामार्गावरील अनमोड घाटातील गोवा हद्दीतील रस्ता शनिवारी मुसळधार पावसामुळे खचला होता.त्यामुळे यामार्गावरील वहातुक ठप्प झाली.अवजड वाहनाना बंदी घालण्यात आली. परंतु रस्त्यावरील वाहतुक सुरळीत व्हावी.म्हणून सध्या रस्ता कोसळलेल्या ठिकाणी रस्ता दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.
तर खचलेल्या रस्त्याच्या बाजुने जेसीबीच्या सहाय्याने रस्ता रूंध्द करण्यात आला आहे.आता खालच्या बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असुन या कामासाठी साधारण दोन महिण्याचा कालावधी लागण्याचा आंदाज वर्तविण्यात येत आहे.
कर्नाटकातुन गोव्यात जाण्यासाठी सर्व वाहनाना अनमोड घाट मार्ग हा सर्वाना सोयीचा त्याचबरोबर जवळचा ठरणार होता.पण महामार्गाचे काम सुरू केल्यापासुन अनमोड मार्गाला जणू ग्रहणच लागल्याचे पहावयास मिळत आहे.तर इतकी वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्नाटक हद्दीत हा मार्ग नैसर्गीक आपत्तीने बंद तरी पडतो किंवा कामानिमित्त बंद पाडवावा लागतो.परंतु प्रथमताच गोवा हद्दीतील सदर मार्ग रस्ता खचल्यामुळे बंद करावा लागला आहे.