#गणेबैल टोल चुकविण्यासाठी रस्त्यावर वाहनाची गर्दी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील माळ अंकले ते इदलहोंड रस्त्याचे डांबरीकरण करूण केवळ चार महिणे ओलांडले नाहीत. तेच या डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.
त्यामुळे सबंधीत कंत्राटदाराच्या कामाचा दर्जा लक्षात येत आहे. निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण हे या खड्ड्याचे कारण आहे.
गणेबैल टोल नाका चुकविण्यास इदलहोंड माळ अंकले रस्ता सोयीचा!
खानापूर तालुक्यात पणजी बेळगाव महामार्गावर गणेबैल जवळ टोलनाका उभारल्याने या परिसरातील स्थानिक चार चाकी व अवजड वाहनाना टोल नाक्याची रक्कम द्यावी लागत.ही रक्कम चुकविण्यासाठी इदलहोंड माळ अंकले रस्ता सोयीचा झाला खरा. मात्र निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे व वाढत्या आवजड वाहतुकीमुळे गेल्या चार महिण्यात खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे.
पावसाळ्यात होणार रस्त्याची दुर्दशा!
सध्या पावसाला जोर आहे.त्यातच वाहनाची वाढती वर्दळ व निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण त्यामुळे पावसाळा संपे पर्यत माळ अंकले इदलहोंड रस्त्याची नक्कीच दुर्दशा होणार यात शंकाच नाही .तेव्हा संबधीत खात्याच्या अधिकार्याने माळ अंकले ते इदलहोंड रस्त्याची पाहणी करून पडलेले खड्डे बुजवावेत व संबधीत कंत्राटदाराला निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल जाब विचारावा. अशी मागणी इदलहोंड,सिंगीनकोप,माळअंकले व झाड गावच्या नागरीकातुन तसेच प्रवाशातुन होत आहे.