#लक्ष्मी हेब्बाळकर फाऊंडेशनच्यावतीने ५० हजार रू.मदत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बेकवाड ( ता.खानापूर ) येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील यांच्या दीड लाख रूपयो किंमतीच्या बैलजोडीचे शेतीचे काम करून बैल धुण्यासाठी तलाव गेलेल्या बैलजोडी बुधवारी दि.१६ रोजी बुडून मरण पावली.
याघटनेमुळे तालुक्यात दु:खाचे सावट पसरले अनेकाना या घटनेचे दु:ख झाले.शेतकर्याला आर्थिक मदत व्हावी. यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी ५१ हजार रूपयाची मदत केली. गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रसाद पाटील यानी ही १० हजार रूपयाची मदत केली.
आज सोमवारी दि २१ रोजी लक्ष्मी हेब्बाळकर फाऊंडेशन च्यावतीने मृणाल हेब्बाळकर यानी बेकवाड गावी भेट देऊन शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील याच्या कुटूंबाचे सात्वन करून त्याना आर्थिक मदत म्हणून ५० हजार रूपयाची मदत देऊ केली.
यावेळी बेकवाड गावचे शेतकरी तसेच नागरीक उपस्थित होते.
याजबरोबर राजेंद्र कब्बूर,महादेव पाटील ,शिवराम पाटील जोतिबा गुरव ,गजानन पाटील ,सुभाष चलवादी,जोतिबा केसरकर तसेच खानापूरातील काॅग्रेसचे नेते उपस्थित होते.