संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
केंद्र सरकारकडून कुंभार समाजातील कलाकारांना थेट सवलत मिळून देण्यासाठी कलाकार ओळखपत्र (अर्टिजिएस कार्ड) वितरण करण्याचा कार्यक्रम सोमवार (दि.८) रोजी गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडला.
कलाकार ओळखपत्र वितरण करण्यापूर्वी खानापूर तालुका संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे सचिव परशराम पालकर यांनी कलाकार ओळखपत्राचे फायदे, ओळखपत्र का महत्वाचे आहे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंडळाचे उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार यांनी तालुका पातळीवर युवक व महिला मंडळाची स्थापना करण्याबाबत मार्गदर्शन केले. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचण्यासाठी कलाकार ओळखपत्र महत्वाची भूमिका बजावते. त्यासाठी प्रत्येकाने कलाकार ओळखपत्र मिळवण्यासाठी मंडळांच्या सदस्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले. या प्रसंगी व्यासपिठावर मंडळाचे ज्येष्ट सदस्य तुकाराम कुंभार, राजा श्री दक्ष फाउंडेशनचे सदस्य महेश कुंभार, गर्लगुंजी ग्राम पंचायत माजी उपाध्यक्षा रेखा कुंभार उपस्थित होत्या.
