तालुक्यात २२२ खेड्यात लसीकरण!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील २२२ खेड्यातुन पशुखात्याच्यावतीने लाळ -खुरकत लसीकरण ८० टक्के पूर्ण झाले आहे.पशु खात्याच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन जनावराना लसीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
खानापूर तालुक्यातुन लसीकरणासाठी ९५ सरकारी पशुसखी, अधिकारी , कर्मचारी तसेच खासगी कर्मचार्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर खानापूर तालुक्यात १५ पशुवैद्यकीय केंद्रामार्फत ही मोहिम राबविण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पशु वैद्याधिकारी डाॅ.मनोहर दादमी म्हणाले की, पशुवैद्यकीय विभागाकडुन म्हैस,गाय, बैलआदीचे लसीकरण करण्यात येत असुन जनावरांची तपासणी करून लस देण्यात येत आहे. तेव्हा तालुक्यातील सर्व जनावरे लाळ खुरकत रोगापासुन मुक्त करण्याचे उद्दीष्ठ विभागाने ठेवले आहे. संपूर्ण तालुका लाळ खुरकत रोगापासुन मुक्त व्हावा, यासाठी खात्याने लसीकरणाचा सोय केली आहे.तालुक्यात कोणते ही जनावर लसीकरणापासिव वंचित राहु नये .अवाहन केले आहे.

