#मुख्याध्यापक पदी बढती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता.खानापूर) गावचे सुपूत्र व भंडरगाळी सरकारी पूर्व प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक शिवाजी दत्ताजी पाटील यांची नुकताच झालेल्या बढती प्रक्रियेमध्ये तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापक पदी बढती झाली.
या निमित्त मंगळवारी दि.१२ रोजी शिवाजी दत्ताजी पाटील यानी तोपिनकट्टी शाळेत येऊन पदभार स्विकारला.मुख्याध्यापक पदी हजर झाल्यानिमित्त तोपिनकट्टी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने स्वागत समारंभ पार पडला.
यावेळी तोपिनकट्टी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष हुवापा गुरव ,सदस्य पी .एन.गुरव, मल्लेशी गुरव, जोतिबा बेकवाडकर,संजय मादार,प्रसाद कोलकार, भिमसेेन करंबळकर तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते.
यावेळी नूतन मुख्याध्यापक शिवाजी दत्ताजी पाटील यांचे फेटा बांधुन व पुष्पहार घालुन एसडीएमसी च्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.

