#मयताच्या नावे मतदान केल्याचा आरोप”
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
जांबोटी ( ता.खानापूर ) पीकेपीएस संघाच्या रविवारी दि.२२ मार्च रोजी जा ले लिया प्राॅक्सी मतदानाच्या वादामुळे आज सोमवारी दि ६ एप्रिल रोजी होना क्या पदाधिर्याच्या निवडीला स्थगिती मिळाली आहे.
या संदर्भात जांबोटी पीकेपीएस संघाच्या माजी चेअरमन सौ धनश्री सरदेसाई यानी सहाय्यक निंबधक , सहकारी संस्था विभाग बेळगाव यांच्याकडे कर्नाटक सहकारी संस्था अधिनियम १९५९च्या कलम ७० अंतर्गत केस दाखल केली होती, रविवारी २२ मार्च रोजी झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीतील मतमोजणी व निकालालाही आव्हान देण्यात आले आहे.या निवडणुकीत मतदार यादीतील अनु क्रमांक ६७८ असलेल्या मृत व्यक्तीच्या नावावर मत देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संबधित व्यक्तिचे निधन दि. १८ जुन २०२१ रोजी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्राँक्सी मतदानमुळे वादी आणि प्रतिवादी समान मते मिळाल्याचा दावा करण्यात आला असुन संबधित मत रद्द झाल्यास वादीचा निश्चित होऊ शकतो.असे वकीलानी युक्ति वादात सांगीतले.सादर केलेली कागदपत्रे व युक्तीवाद विचारात घेऊन सहाय्यक निंबधकांनी अंतरिम अर्ज मंजुर केला असुन त्याअनुषंगाने आज सोमवारी दि, ६ एप्रिल होणारी पदाधिकार्यांची निवड पुढील आदेशापंर्यत स्थगीत करण्याचा आदेश दि ३१ मार्च जारी करण्यात आला आहे.
