#विविध कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील सरकारी प्रथम दर्जा काॅलेजच्या वतीने एन एस एस शिबीराला आयोजन आसोगा ( ता. खानापूर ) येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
मंगळवारी दि. १ एप्रिल पासुन एन एस एस शिबीराला प्रारंभ झाला.विविध कार्य क्र मानी शिबीराचे लाभ विद्यार्थ्यानी घेतला.
सोमवारी दि. ६ रोजी वन सुरक्षा याविषयावर पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, कदंबा सोशल फाऊंडेशनचे चेअरमन जार्डन गोन्साल्विस व निवृत्त पोलिस अधिकारी सुभाष सत्यगेरी, डाॅ. अलका कुरणे,व काॅलेजचा प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत एन एस एस शिबीरार्थीनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केले.
उपस्थित पाहुण्याच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी पत्रकार प्रसन्ना कुलकर्णी, जाँर्डन गोन्साल्विस, सुभाष सत्यगेरी आदीनी विद्यार्थ्याना वन सुरक्षा संदर्भात योग्य मार्गदर्शन केले.
या वेळी शिबीराला ४२ एन एस एस शिबीरार्थीचा सहभाग होता.तसेच काॅलेजचे प्राध्यापक वर्ग ही होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
