मंगळवारी ते गुुरूवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील यडोगा गावचे ग्राम दैवत श्री विठ्ठल रूक्मिणी, व जय हनुमान मंदिरांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी दि.३१ मार्च ते गुरूवारी दि.२ एप्रिल या काळात होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी दि.३१ मार्च रोजी मुक्ति मिरवणुक , होम हवन , विविध धार्मिक कार्यक्रम , रात्री महाप्रसाद व श्रीरवळनाथ भारूड भजनी मंडळ शेडगाळी यांचे भारूड भजनी कार्यक्रम,
बुधवारी दि.१ एप्रिल रोजी मुर्ती प्रतिष्ठापणा,मंदिर लोकार्पण सोहळा व रात्री कीर्तन ,
गुरूवारी दि. २ एप्रिल रोजी हनुमान जयंती, माहेरवासीनीचा हळदी कुंकू ,कार्यक्रम,व दुपारी महाप्रसाद तर रात्री शिनोळी येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
