संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
किरावळे गुंजीक्राॅस ( ता. खानापूर ) येथील श्री गोरक्षनाथ मठ नूतन समाधी इमारतीचे उदघाटन व प्राण प्रतिष्ठाण सोहळा परम पूज्य गुरू गोरक्षनाथ यांच्या आशिर्वादाने तसेच भगवान शिव कृपाने आज रविवार दि .२९ व सोमवार दि. ३० रोजी सकाळी ११.३० वाजता होत आहे.
या वेळी कार्यक्रमाला राज योगी निर्मल नाथजी-कदरी मठ मंगलोर ,पीर योगी रतन नाथजी जम्मू काश्मीर,राज गुरू श्रध्दा नाथजी विठ्ठल मठ,पीर योगी गणेश नाथजी त्र्यंबकेश्वर,पीरयोगी पारस नाथजी बत्तीस शिराळा मठ,पीरयोगी भयंकर नाथजी दादा मठ डोंगरगांव, पीरयोगी शिंगनाथजी बाळग मठ वाटरे,पीर योगी मोहन नाथजी हंडीभडंगनाथ मठ कुंभारवाडा, पीर योगी शुकदेव नाथजी चंद्र गुप्ती,पीर योगी दीपक नाथजी कोल्हापुर,पीर योगी संगम नाथजी साई खेडा,पीर योगी अजय नाथजी परांडा,पीर योगी श्याम नाथजी सोनिरि मेरू, पीर महंत योगी शिव नाथजी सौंदत्ती,महंत सोमार जी मूदगड,महंत मंगल नाथजी लोकी मठ,महंत मेघनाथजी करल कटा,महंत छुनी नाथ करजणि,महंत भिष्मनाथ पुणे,महंत त्रीशूल नाथ कोडवा,महंत दीपक नाथ रामटेकडी पुणे,महंत भगवान नाथ गीवडी, महंत दिग्विजय नाथ आळंदी पुणे,महंत माया नाथ जी आळंदी,महंत तेज नाथजी आळंदी,महंत नवमी नाथ जी आंळदी,महंत मौज नाथजी तुळजा भवनी,महंत विश्व नाथजी राहुता, महंत सेवा नाथजी भ्रम पराडा,महंत संगम नाथजी विशाल गणपती नगर, महंत निर्मल नाथ जी राशन नगर ,महंत रामेश्वर नाथजी चौफुला,महंत लागमन नाथजी केडगाव ,महंत रवि नाथ टेकडी मंजर, महंत ज्वाला नाथ आळेफाटा, महंत गणेश नाथ पुणे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या वेळी धार्मिक कार्यक्रम आज रविवारी दि .२९ व उद्या सोमवारी दि.३० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत धूनी पूजन ,गुरू वंदना, प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान,रुद्र अभिषेक ,महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी २ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी भाविकानी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकानी केले आहे.

