संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेचे राज्य संघटना कार्यदर्शी, खानापूर तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीचे संचालक, कर्नाटक राज्य नोकर संघटनेचे माजी निर्देशक तसेच ओतोळी मराठी शाळेचे मुख्याध्यापक के.एच.कौदलकर यांचा वाढदिवस रविवारी दि.२२ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निवृत्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड,ट्रिब्यूनल मेबर विनायक मुतगेकर, कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष बी बी चापगावकर, बी.आय.इ.आर.टी शंकर कम्मार, एन पी एस तालुका अध्यक्ष रमेश कवळेकर,शिक्षक सोसायटी माजी अध्यक्ष आय बी सनदी,प्रेरणा सोसायटी अध्यक्ष महेश हेब्बाळकर, एन जी ओ संचालक बापू दळवी, जोतिबा घाडी,मुख्याध्यापक पद्माकर गावडे,शिक्षक सोसायटी संचालक नेताजी शिवनगेकर, रवी सुतार, आदी उपस्थित होते.
या वेळी रमेश कवळेकर यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
तर वाढदिवसानिमित्त के. एच.कौदलकर यानी केक कापून वाढ दिवस साजरा केला.
या वेळी बोलताना बी बी चापगावकर म्हणाले की, मुख्याध्यापक के. एच कौदलकर यानी शिक्षण क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षापासुन संघटनाच्या विविध पदावर राहुन चांगल्या प्रकारचे कार्य केले आहे.संघटनेच्या माध्यमातुन शिक्षकांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत.त्यामुळे अनेक समस्या त्यानी सोडविल्या आहेत. अनेक समस्या सोडविण्यासाठी मोर्चा, निवेदन देऊन शिक्षकाना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत असतात.त्यामुळे ते संघटनेच्या विविध पदावर कार्यरत आहेत.
असेच कार्य या पुढे त्याच्या हातुन घडो.अली सदिच्छा व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी उपस्थित मान्यवरानी के.एच.कौदलकरा्च्या कार्याचे गोड कौतुक करत त्याना वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्या.
यावेळी वाढदिवसानिमित्त मुख्याध्यापक के .एच.कौदलकर यांचा शिक्षक सोसायटी, शिक्षक संघटना, तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व मित्रमंडळानी शाल, पुष्पहार , पुष्पगुच्छ व भेट वस्तु देऊन सत्कार केला. शुभेच्छा दिल्या.
या वेळी सत्काराला शुभेच्छा देताना मुख्याध्यापक के. एच.कौंदलकर म्हणाले की, मला शिक्षकाचे नेहमी सहकार्य मिळत गेले, त्यामुळे संघटनेते धाडसाने काम करण्यास वाव मिळाला. विविध संघटनेची पदे भुषविले याला शिक्षकवर्गाचे पाठबळ होते.म्हणून मला शक्य झाले.प्रत्येकाच्या आडचणीच्या वेळी मी सतत भाग घेऊन त्याना सहकार्य केले.त्यामुळेच शिक्षक सतत माझ्या पाठीशी असतात. याचा मला अभिमान आहे.असेच माझ्या पाठीशी राह. असे मनोगत व्यक्त केले.
या वेळी मुख्याध्यापक बापू दळवी यानी आभार मानले.

