आदित्य दिपक कुबल यांचे निधन
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील स्टेशन रोड येथील रहिवाशी तसेच श्रीमहालक्ष्मी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आदित्य दिपक कुबल ( वय ३३ )याचे शुक्रवारी दि.१३ रोजी ब्रेनहॅमरेजमुळे उपचारादरम्यान निधन झाले.
गेल्या तीन दिवसापासुन त्यांच्यावर. बेळगाव येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.आज त्यांची प्राणज्योत मावळली,
त्याच्या पश्चात आई, वडील,पत्नी , एक मुलगी, बहिण असा परिवार आहे.
क्षत्रिय मराठा समाजाचे नेते व बेळगाव जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संजय कुबल याचे ते पुतणे होत.
त्यांच्या अत्यंविधी आज शुक्रवारी दुपारी खानापूर स्मशानभुमीत होणार आहेत.