#लाईनमन कर्मचार्याचा सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता सतत कार्यरत असणार्या लाईन मँनचा हेस्काॅम खात्याच्या पावर मॅन डे ( लाईन मन ) दिन गुरूवारी दि. १२ रोजी साजरा करण्यात आला.
या वेळी सेक्शन आँफिसर श्री भरतेश ,लक्ष्मी रंगनाथ,एईटी सी. एस. अंगडी,सेक्शन आँफिसर नागेश दौलतकर,जावीद नाईकवाडी,भरतेश नागनुर,श्री.चक्रीमठ,शिवू मुरगो़ड,लक्ष्मिकांत रंगणात, बिडीचे एस ओ.श्री संतोष, श्री धर्मादास आदी उपस्थित होते.
या वेळी सत्कार प्रसंग सहाय्यक अभियंते सी.एस.अंग डी म्हणाले हेस्काॅम खात्याचे कर्मचारी लाईन मॅन म्हणून सेवा बजावताना ऊन ,वारा, पाऊस याचा कधी विचार करत नाहीत.त्यातच खानापूर तालुका हा अति जंगलाने व्यापलेला तालुका अशा जंगल भागात धोधो पावसात वीज़ पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करतात.जीव घेण्या कामात कधीच मागे बघत नाही.पाऊस असो ऊन असो विधुत खांबावर चढुन काम करतात.व जास्तीत जास्त वीज पुरवठा सुरळीत करतात.अशा कर्मचार्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.अशा कर्मचार्याचा पावर मॅन डे साजरा करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे सर्वाचेच कर्तव्य आहे.असे मत व्यक्त केले.
या वेळी सर्व लाईनमॅनचा शाल , पुष्पगुंच्छ दे ऊन सत्कार करण्यात आला.
“
